सिमोल्लंघनानंतर अजितदादा पवार यांचा झंझावाती राज्यव्यापी दौरा Sunil Tatkare यांची माहिती…

सत्तेतील शंभर दिवसानिमित्त अजितदादा पवारांनी जनतेला जी भावनिक साद घातली त्या भावनिक पत्राला जनता नक्कीच प्रतिसाद देईल...

Sunil Tatkare  – दसर्‍याच्या सिमोल्लंघनानंतर पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी झंझावाती दौरा सुरू करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (NCP State President MP Sunil Tatkare) यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली. पक्षातंर्गत बैठकीसाठी आज प्रदेश कार्यालयात आले असता सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारांचा पगडा प्रभावीपणे आमच्यावर आहे. ज्या विचारधारेतून सुसंस्कृत महाराष्ट्र घडला तीच विचारधारा घेऊन अनेक वर्षे काम करत आहोत. आज सत्तेत जाऊन शंभर दिवस होत असताना अजितदादा पवार यांनी भावनिक साद घातली आहे, भावनिक पत्र लिहिले आहे त्या ‘सादेला’ त्या ‘पत्राला’ जनता नक्कीच प्रतिसाद देईल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

यशवंतराव चव्हाणसाहेबांचे राजकारण पाहिले तर भाषा, प्रांतरचना झाल्यावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान आणि १९८४ पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास देशपातळीवर महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला. एकमेव नेते आहेत ज्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री पद अत्यंत सक्षमपणे सांभाळले. १९६२ च्या युध्दाच्यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना दिल्लीत बोलावले. त्यावेळी ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ असे वर्णन केले गेले होते. मात्र त्यांनी जी भूमिका मांडली तो कालखंड एकपक्षीय राजवटीचा होता. त्यानंतर राज्यात आघाडी सरकारची अपरिहार्यता आली.

जो विचार चव्हाणसाहेबांनी मांडला तो त्यावेळच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने होता. मात्र १९८९ सालापासून या देशात एकेकाळचा बिगर कॉंग्रेस व इतर पक्ष एकत्र यायचे त्यानंतर बिगर भाजपा ‘एनडीए’ नावाने एकत्र येतात. यातील अनेक पक्षांची राजकीय आयडीयालॉजी पूर्णपणे भिन्न आहे, विरोधाभासाची आहे. त्या पक्षांनीसुध्दा वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पाठिंबा दिल्याचे पहायला मिळाले. १९८९ मध्ये दोन सरकारे आली. १९९१ मध्ये नरसिंहरावांचे सरकार आले त्यावेळीसुध्दा नरसिंहरावांच्या सरकारला पाठिंबा देताना मूळ कॉंग्रेसच्या विचारधारेच्या टोकाच्या विरोधात असलेल्या पक्षांनीसुध्दा नरसिंहरावांना पाठिंबा दिला होता.

९६, ९८, ९९ या तीन कालावधीत तीन निवडणूका झाल्या त्यावेळी वेगवेगळी सरकारे आली त्यावेळी भिन्न विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. १९७८ साली पुलोद स्थापन झाले त्यावेळीसुध्दा हशु अडवाणी, उत्तमराव पाटील त्या सरकारमध्ये होते. परंतु आज जो दावा केला जात आहे तो केवळ चव्हाणसाहेबांचा विचार पुढे घेऊन जे मत अजितदादांनी व्यक्त केले आहे त्या मताला केवळ तांत्रिक अर्थाने छेद देण्याचा प्रयत्न केला जात आहे असे स्पष्ट मत सुनिल तटकरे यांनी अनेक दाखले देत मांडले.

यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारधारेवरच वर्षानुवर्षे आम्ही काम करत आलो आणि पुढेही करत राहू असे सांगतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात एकपक्षीय राजवट नाहीय. महाराष्ट्राच्या राजकारणात आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. तसे असेल तर आम्ही २०१९ मध्ये कुठल्या विचाराने शिवसेनेसोबत युती केली त्याचे उत्तर काय आहे. त्यांच्यासोबत युती करत असताना कुठला विचार आम्ही स्वीकारला होता याचे उत्तरही द्यावे असे थेट आव्हान सुनिल तटकरे यांनी विरोधकांना दिले आहे.

अजितदादा पवार यांनी आज जे पत्र लिहिले ते स्वयंस्पष्ट आहे. त्यात राजकीय अनिवार्थ त्यांना जो काढायचा असेल तर त्यांना तो काढता येऊ शकतो. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता ज्यावेळी येत असते त्यावेळी असे घडत असते. कधी स्वप्नातही वाटू शकते का कॉंग्रेसच्या लोकांनी मला सांगावे किंवा उत्तर द्यावे… सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्ष उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नुसता पाठिंबा नव्हेच तर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मदत करु शकतो आणि सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो हे कुठल्या राजकीय विचारधारेमध्ये बसते याचे उत्तर दिले तर आमच्या ज्ञानात भर पडेल असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.

आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून भूमिका स्वीकारली. आमचा पक्ष हा लोकशाही मानणारा आहे. १९९९ साली छगन भुजबळसाहेब यांची निवड होत असताना पक्षातंर्गत आमदारांमधून निवडणूक झाली. २००४ मध्ये आर. आर. पाटील हेसुद्धा पक्षातंर्गत निवडणूकीतून अध्यक्ष झाले. यावेळी पक्षातील ९० टक्के आमदारांना सत्तेत सहभागी व्हावे असे वाटले. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली आणि मित्र पक्षाचे सरकार येईल अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी आज शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाने जणूकाही तेच राजकीयदृष्ट्या जन्माला आले असा दावा करणाऱ्या मंडळींनीसुध्दा भाजप सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी जे पत्र लिहिले होते त्या पत्रावर त्या आमदारांच्या सह्या आहेत. या पत्रावर सर्व आमदार, महाविकास आघाडीतील आमदारांच्या सह्या आहेत. त्या पत्रात भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी व्हावे यासाठी पक्षाच्या तीन नेत्यांची एक समिती स्थापन केली गेली होती याची आठवणही सुनिल तटकरे यांनी करुन दिली आहे.

२०१४ च्या निवडणुकीनंतरसुध्दा भाजपने पाठिंबा मागितला नसताना आम्ही बाहेरून पाठिंबा दिला होता. ही वस्तुस्थिती खरी आहे त्यामुळे ज्यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तर त्यांनी केलेल्या ट्विटवर अधिक माहिती सांगितली तर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगला प्रकाश पडेल असा खोचक टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला आहे.

युवा संघर्ष यात्रा… कसला संघर्ष… कुणाशी संघर्ष हे आपल्याला कळेलच. युवा संघर्ष यात्रा ज्यांनी काढली आहे त्यांनीच भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पत्रावर सही केलेली होती. राम शिंदे यांनी त्यांना काही प्रश्न विचारले होते त्याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळालेले असे कुठे दिसत नाही असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया