Nanded : भाजपा सरकारला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवे आहेत? रुग्णांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे संतापल्या

Nanded Government Hospital Incident : नांदेड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाला असल्याचं काल समोर आलं. यामध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, भाजपा सरकारला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवे आहेत? आरोग्याशी संबंधित यंत्रणेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरु असताना राज्यकर्ते हात बांधून स्वस्थ बसले आहेत .संवेदनशील राज्यकर्त्यांनी आतापर्यंत संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला असता.

नांदेड, ठाणे येथील रुग्णांच्या मृत्युंचे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एकाच दिवशी दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तर नांदेडच्या त्याच रुग्णालयात आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला असून ही संख्या आता २४ वरुन ३१ झाली आहे. हे सर्वजण सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष व निष्काळजीपणाचे बळी आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेमध्ये अनागोंदी कारभार दिसत असूनही यावर उपाययोजना करण्याची शासनाची मानसिकता दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा देऊन आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेणे आवश्यक आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली, या रुग्णांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असे त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar