अकलूज : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त शालेय मुला-मुलींच्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन

अकलूज : प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर- अकलूज च्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील (Sahakar Maharshi Shankarao Mohite-Patil) यांच्या जयंती निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक २३ ते २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत शालेय मुला-मुलींच्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन स्मृतीभवन शंकरनगर या ठिकाणी करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाट्न मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष मा.श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, बाल कलाकार तन्वीर घोडके, स्वराली मोरे यांच्या शुभहस्ते व मंडळाच्या अध्यक्षा मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर माळशिरस तालुक्याचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, माळशिरस बार कौन्सीलचे अध्यक्ष अॅड. नितीन खराडे, अकलूज चे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे प्रमुख संजय गळीतकर यांनी केले. सुरुवातीस प्रतिमा पूजन करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात जयसिंह मोहिते पाटील यांनी १९७६ पासून मंडळाने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अनेक सामाजिक, उपक्रम राबविले असून यामाध्यमातून अनेक खेळाडूंना, कलाकारांना आपले कौशल्य सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ग्रामीण भागातील शाळांचाही सहभाग वाढण्यासाठी प्रत्येक सहभागी शाळेस ५००० रु. प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले. स्पर्धेतील सहभागी कलाकारांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे जगदीश निंबाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

ही स्पर्धा शहरी, ग्रामीण, अतिग्रामीण या तीन गटात भरविण्यात आली असून प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रे व रोख बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. आज गट क्र.१ व २ मधील एकूण ३५ गीते सादर झाली. यामध्ये एकूण ४९२ कलाकारांनी आपली कला सादर केली.

या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक अकलूज चे संचालक बाळासाहेब सणस, प्रशाला समिती सदस्य सर्जेराव कदम प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सचिव पोपट भोसले पाटील, खजिनदार वसंत जाधव स्पर्धा प्रमुख पोपट देठे, अमोल फुले, प्रा.डॉ.विश्वनाथ आवड, संचालक, सदस्य, पत्रकार, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज व जि. प. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर, कलाकार, पालक, बहुसंख्य प्रेक्षक उपस्थिती होते. सूत्रसंचालन राजकुमार पाटील, किरण सूर्यवंशी, शकील मुलाणी, जाकीर सय्यद, पोपट पवार यांनी केले. आजची स्पर्धा अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडली.