सुषमा अंधारेंनी पुन्हा ओकली गरळ; वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांवर केला गंभीर आरोप

पुणे – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) त्यांच्या वाचाळपणासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी अनेक हिंदू देवीदेवतांची यथेच्छ बदनामी केली आहे. आता त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आता त्यांनी मोर्चा अखिल विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाकडे वळवला आहे.

वारकरी संप्रदायातील महान संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर (Sant Eknath Maharaj, Sant Dnyaneshwar) तसेच महाबली हनुमान यांच्याबाबत त्यांनी नुकतीच अक्षरशः गरळ ओकली होती. त्यांच्या भाषणामधील काही वक्तव्यामुळे वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सुषमा अंधारेंवर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.

दरम्यान, चौफेर टीका होऊ लागल्याने सुषमा अंधारे यांना माफी मागावी लागली होती. हा वाद मिटेल असे वाटत असताना पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करणाऱ्या कीर्तनकारांच्या विरोधात गरळ ओकली आहे. किर्तनकार हे वारकरी संप्रदायाचे नसून ते मोहन भागवत (Mohan Bhagawat) संप्रदायाचे आहेत असे धक्कादायक विधान केले आहे.

वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद अद्याप संपलेला नाही. अशात सुषमा अंधारे यांनी पुन्‍हा वाद निर्माण केला आहे. त्‍यांनी माझ्या विरोधात आंदोलन करणारे किर्तनकार हे पेड किर्तनकार असून ते मोहन भागवत संप्रदायाचे आहेत; असे वक्तव्य केले आहे. saam टीव्ही ने याबाबत वृत्त दिले आहे.