कॉंग्रेसला आणखी एक मोठा धक्का; दिग्गज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत 

चंडीगड – पंजाबमध्ये काँग्रेसला (Punjab Congrss) लवकरच आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा देणारे सुनील जाखड (Sunil Jakhad) लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करू शकतात. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर सुनील जाखड यांनी फेसबुक लाईव्ह (Facebook LIVE) करत काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला होता. तुम्ही शत्रू आणि मित्र ओळखू शकत नसाल तर किमान दायित्व आणि मालमत्ता ओळखायला शिका, असे त्यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) सांगितले होते.

सुनील जाखड यांनी 13 ते 15 एप्रिल दरम्यान राजस्थानच्या उदयपूरमध्ये (Udaipur) झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरावरही प्रश्न उपस्थित केले होते. चिंतनशिविर हे नावच चुकीचे असल्याचे ते म्हणाले होते. त्याचे नाव चिंता कॅम्प (Chinta Camp) ठेवायला हवे होते. काँग्रेस नेत्यांचा हेतू पक्ष वाचवण्याचा नसल्याचा आरोप त्यांनी केला.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत (UP Elections)  एवढं का बिघडलं यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने चिंतन शिबिरात किमान एक समिती स्थापन करायला हवी होती. काँग्रेस नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले की, यूपीमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. तेथील 390 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना 2 हजारांपेक्षा कमी मते मिळाली. यापेक्षा जास्त मते पंचायत सदस्यालाही मिळतात.