केतकीच्या या कृत्यामागे कर्ता करविता वेगळा आहे – पेडणेकर

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर केतकी चितळेने ( Ketki Chitale ) आक्षेपार्ह पोस्ट केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केतकीच्या पोस्टचा तीव्र शब्दात विरोध केला जातोय. इतकचं नाही तर केतकीविरोधात अनेक ठिकाणी तक्रार करण्यात  आल्या असून पुणे, कळवा, गोरेगाव, बीड आणि उस्मानाबाद या ठिकाणीही गुन्हे दाखल झालेत. या पोस्टमुळे अभिनेत्रीला अटक देखील झाली आहे.

केतकीच्या या फेसबुक पोस्टने राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. यातच आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केतकीच्या कृत्याचा निषेध व्यक्त करत तिच्या आजाराविषयी टीका केली आहे, त्याच बरोबर यामागे कर्ता करविता कोणी वेगळाच असल्याचं त्यांनी म्हटलंय.

केतकी चितळे पोस्ट प्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे, त्या म्हणाल्या केतकी चितळेबाबत बोलायचं झालं तर तिच्या आजारपणाचं सगळ्यांना माहिती आहे. तिच्या या कृत्यामागे कर्ता करविता वेगळा आहे.  या विकृत प्रवृत्तीचं समर्थन करू नये असा सल्ला पेडणेकरांनी दिला आहे.