ऑस्ट्रेलियात पुन्हा मंदिराची तोडफोड, 12 जानेवारीला स्वामी नारायण मंदिरालाही लक्ष्य करण्यात आलं होतं

Crime : खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियातील एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले आहे. खलिस्तानी समर्थकांनी येथील व्हिक्टोरिया राज्यातील एका मंदिराची तोडफोड केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियात एका हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची ही घटना आठवडाभरात घडली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅरम डाउन्स, व्हिक्टोरिया येथील ऐतिहासिक श्री शिव विष्णू मंदिराची सोमवारी तोडफोड करण्यात आली. तामिळ हिंदू समुदायाने साजरा केल्या जाणाऱ्या तीन दिवसीय ‘थाई पोंगल’ उत्सवादरम्यान भाविक दर्शनासाठी जात असताना खलिस्तानी समर्थकांनी हा हल्ला केला.

ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवर हल्ल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी १२ जानेवारीला मेलबर्नमधील स्वामीनारायण मंदिराला समाजकंटकांनी लक्ष्य केले होते. मंदिराची प्रशासकीय संस्था BAPS स्वामीनारायण संस्था ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी करून या घटनेचा निषेध केला आहे.