Siddharth Chandekar | अशा लोकांना महाराजांशी किंवा त्यांच्या विचारांशी काहीही देणं घेणं नाही, ट्रोलर्सवर भडकला सिद्धार्थ चांदेकर

Siddharth Chandekar | अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. यावरुन गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. जहांगीर हे मुस्लिम नाव आहे. त्यामुळे तुम्ही ‘भारत सोडून जा’, ‘अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात राहायला जा’, असे मेसेज केले जात आहेत. हे पाहून चिन्मयची पत्नी नेहा मांडलेकर भडकली. त्यानंतर चिन्मयने आपण इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नसल्याचा निर्णय घेतला. आता ‘आपल्या मनातली घाण बाहेर काढणं हाच ट्रोलर्सचा धर्म आणि हाच त्यांचा उद्योग’, असं म्हणत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही (Siddharth Chandekar) चिन्मयला निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.

‘जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या लोकांना महाराजांशी किंवा त्यांच्या विचारांशी काहीही देणं घेणं नाही. आपल्या मनातली घाण बाहेर काढणं हाच त्यांचा धर्म आणि हाच त्यांचा उद्योग. तू महाराजांची भूमिका खूप निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे केली आहेस आणि कलाकार म्हणून आम्ही सगळेच त्यासाठी तुझा आदर करतो. ही भूमिका करणं थांबवू नकोस. प्लीज! आम्ही सगळे तू, नेहा आणि जहांगीरच्या बरोबर आहोत’, असं सिद्धार्थ चांदेकरने लिहिलंय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन