Sunetra Pawar | ‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ नानासाहेब नवलेंनी सुनेत्रा पवारांचं केलं तोंडभरुन कौतुक

पौड| बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या रविवारी मुळशी तालुक्यातील प्रचार दौऱ्यात होत्या. या दौऱ्यात ताथवडे येथे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, चेअरमन, माजी खासदार, ज्येष्ठ नेते नानासाहेब नवले यांनी भेट दिली. सुनेत्रा पवार येणार असल्यानं नानासाहेब नवले हेही त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी आले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी घरात पाऊल टाकताच नानासाहेब नवले म्हणाले ‘यु आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉ’. यावर उपस्थित सर्वांनीच आनंद व्यक्त केला. तर, सुनेत्रा पवार यांनी मात्र नानासाहेब नवले यांना नमस्कार करून कौतुकाचा विनम्रपणे स्वीकार केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना परके ठरवले होते. या वक्तव्यावर टीका झाल्याने पवारांना कधी नव्हे तो खुलासा करून ‘आपण तसे बोललो नाही, आपला उद्देश तसा नव्हता. आपल्या म्हणण्याचा गैर अर्थ काढला,’ असे सांगून स्वतःच्या कृत्याचे खापर माध्यमांवर फोडले होते. तसेच, शरद पवारांनी नानासाहेब नवलेंच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्याच नानासाहेब नवलेंनी सुनेत्रा पवारांना, ‘तू सर्वात बेस्ट सून आहेस,’ असे प्रशस्तीपत्रक दिले. एवढेच नाही तर खूप आग्रह करून दोन घास तरी खाल्लेच पाहिजेत, असे सांगून जेवण करायला लावले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन