ऑटोरिक्षासाठी लवकरच नवीन मालिका, आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : ऑटोरिक्षा व तीनचाकी माल वाहतूक वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच ऑटोरिक्षा व तीनचाकी माल वाहतूक वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना हवा असणारा आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक तीनपट शुल्क भरुन हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयाच्या परिवहन विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील. एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी ९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वा. कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. त्या अर्जांसाठी त्याच दिवशी दु. ४.३० वा. परिवहन विभागात लिलाव करण्यात येईल.

ज्या ऑटोरिक्षा व तीनचाकी मालवाहू वाहनांना हवा असणारा आकर्षक व पसंतीचे क्रमांक उपलब्ध असल्यास विहित नमुन्यातील अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) ९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयाच्या परिवहन विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील. एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी १० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वा. कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. या अर्जांसाठी त्याच दिवशी दु. ४.३० वा. परिवहन विभागात लिलाव करण्यात येईल.

डीडी ‘आर.टी.ओ.,पुणे’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा डीडी हा एकाच सीलबंद पाकीटासह जमा करावा.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.

https://youtu.be/GmVj7hqrh5o

Previous Post
kirit somayya

‘दोन कवडीचा दावा करता येत नाही म्हणून सोमय्यांच्या विरोधात एक रुपयाचा दावा दाखल करणार’

Next Post

ऐन दिवाळीत भेसळखोरांचा पर्दाफाश, भेसळ केल्याप्रकरणी जप्तीची कारवाई

Related Posts
NCP

भारिप व भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; कारंजा – मानोरा नगरपंचायतीचे २३ नगरसेवक व कार्यकर्त्यांचाही प्रवेश 

मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम, मावळ आणि ठाणे…
Read More
Ajit Pawar | "हा पठ्ठ्या ऊस नेईल अन् भाव पण चांगला देईल”, अजित पवारांनी जिंकली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मनं

Ajit Pawar | “हा पठ्ठ्या ऊस नेईल अन् भाव पण चांगला देईल”, अजित पवारांनी जिंकली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मनं

Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोमाने प्रचार सुरु आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार…
Read More
Video: आशिया कपमध्ये भारत अन् बांगलादेशचे खेळाडू चालू सामन्यात मैदानावर भिडले अन्...

Video: आशिया कपमध्ये भारत अन् बांगलादेशचे खेळाडू चालू सामन्यात मैदानावर भिडले अन्…

श्रीलंकेत झालेल्या इमर्जिंग आशिया चषक 2023 च्या (Emerging Asia Cup 2023) दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत-A (IND-A) ने…
Read More