Mallikarjun Kharge | ‘…किमान माझ्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहा’, मल्लिकार्जुन खर्गे यांचे कलबुर्गीमध्ये जनतेला भावनिक आवाहन

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी बुधवारी कलबुर्गीतील (Kalburgi) जनतेला त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहावे, असे भावनिक आवाहन केले आहे. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपूर येथे एका सभेला संबोधित करताना, 81 वर्षीय खर्गे म्हणाले की, जर त्यांनी (लोकांनी) काँग्रेस उमेदवाराला मत दिले नाही तर त्यांना असे वाटेल की आता कलबुर्गीमध्ये त्यांच्यासाठी जागा नाही. कलबुर्गीतून भाजपचे विद्यमान खासदार उमेश जाधव यांच्या विरोधात काँग्रेसने खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांना उमेदवारी दिली आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?
यावेळी कलबुर्गीतील जनतेला खर्गे म्हणाले की, यावेळी तुम्ही मतदानाला चुकलात तर मला वाटेल की येथे माझ्यासाठी जागा नाही आणि मी तुमची मने जिंकू शकलो नाही. वास्तविक, खर्गे यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत येथून विजय मिळवला होता, तर 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

ते म्हणाले, तुम्ही आम्हाला (काँग्रेस) मत द्याल की नाही? पण जर तुम्हाला वाटत असेल की मी कलबुर्गींसाठी काही केले आहे तर किमान माझ्या अंत्यविधीला या.भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीचा पराभव करण्यासाठी माझा जन्म झाला आहे, त्यांच्यापुढे शरण येण्यासाठी नाही, असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. मी राजकारणासाठी जन्माला आलो, असे ते म्हणाले. मी निवडणूक लढवू किंवा नाही लढलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करेन. मी राजकारणातून संन्यास घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, पदावरून निवृत्ती आहे, पण एखाद्याच्या तत्त्वांपासून निवृत्त होता कामा नये. यावेळी खर्गे यांनी सिद्धरामय्या यांना तत्त्वांचे पालन करण्याचा सल्लाही दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ