Asia Cup Final: सिराजची रेकॉर्डतोड कामगिरी, श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर झाला ऑल आउट

Asia Cup Final: भारत विरुद्ध श्रीलंका (india vs sri lanka) संघात सुरू असलेला आशिया चषक २०२३चा (Asia Cup 2023) अंतिम सामना अतिशय रोमहर्षक राहिला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या फलंदाजांची कोंडी केली आणि अवघ्या ५० धावांवर लंकेचा संघ सर्वबाद झाला. या लाजिरवाण्या कामगिरीसह श्रीलंकेचा संघ वनडे स्पर्धेतील अंतिम सामन्यात इतकी कमी धावसंख्या करणारा पहिलाच संघही (Sri lanka all out on 50) बनला आहे.

त्याचे झाले असे की, नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना अवघ्या ५० धावांवरच रोखले. सिराजने ७ षटके टाकताना केवळ २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. अष्टपैलू हार्दिकने २.२ षटकात ३ धावांवर ३ विकेट्स काढल्या. तर बुमराहनेही एका फलंदाजाला बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या-

Dhanashree Verma: माझी ताजमहल…; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल