कसबा मतदासंघातून यावेळेस हेमंत रासने हेच सर्वाधिक मतांनी निवडून येतील – बावनकुळे 

Hemant Rasane : दीपावलीच्या सणानिमित्त कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख  हेमंत रासने यांच्या तर्फे आयोजित भाजपाचा दिवाळी फराळ आणि स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Maharashtra BJP State President Chandrasekhar Bawankule and Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नू.म.वि. प्रशाला पुणे येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप महाराष्ट्र  सरचिटणीस मा. श्री. मुरलीधर मोहोळ, पुणे शहराध्यक्ष मा. श्री. धीरज घाटे, पुणे शहरातील भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष, श्री. योगेश टिळेकर, पुण्याचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस नेते मा, श्री. अंकुशजी काकडे,  माजी पुणे शहराध्यक्ष मा. श्री. योगेश गोगावले, माजी राज्यसभा खासदार मा श्री. संजय काकडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) प्रदेश प्रवक्त्या मा. रुपालीताई ठोंबरे पाटील, पुणे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आदि पदाधिकारी, पोलीस सहकारी उपस्थित होते. सोबतच सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, सहकार, वैद्यकीय, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच गणेश मंडळ कार्यकर्ते  उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात संविधान दिननिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून तसेच संविधानाने झाली. यावेळी कार्यक्रम आयोजक आणि कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंतजी रासने यांनी कार्यक्रमाच्या उद्दिष्टाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा कार्यक्रम कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी एकत्र येण्याची आणि आनंद साजरा करण्याची संधी आहे आणि महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील  यांच्या उपस्थितीने आज या कार्यक्रमाचा उत्साह वाढला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "दीपावली हा एक आनंदोत्सव आहे. या सणानिमित्त आपण सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकमेकांना भेटू शकतो आणि आपला सलोखा वाढवू शकतो. हेमंतजी रासने यांनी पोटनवडणुकीतील पराभवाने न खचता पुन्हा नवीन जोशाने कार्याला सुरुवात केली असून आता कसबा मतदासंघांतील नागरीकांच्या मनात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. आणि यावेळेस नक्कीच ते सर्वाधिक मतांनी निवडून येतील हा मला विश्वास आहे.

दरम्यान, बावनकुळे यांनी या कसबा मतदारसंघातील नागरिकांना रासने यांनी अयोध्येतील प्रभू रामचंद्राचे दर्शन घडवावे अशी सूचना केली. यानंतर राम जन्मभूमीत पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या प्रयत्नातून साकारण्यात येणारे ऐतिहासिक मंदिर पाहण्यासाठी आपल्या ५००० पेक्षा अधिक नागरिकांना,प्रमुख पदाधिकाऱ्यांना अयोध्येत नक्की घेऊन जाईल आणि मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे याना दिलेला शब्द मी नक्कीच पूर्ण करेन असा शब्द हेमंत रासने यांनी दिला.

यावेळी पुणे शहरातील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, सहकार, वैद्यकीय, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, पोलीस सहकारी, व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. तसेच, एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.