Dhanashree Verma: माझी ताजमहल…; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

Dhanashree Verma : भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांची जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. एकीकडे चहलला आशिया चषकाच्या संघातून वगळल्याने संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यातच धनश्रीने अलीकडेच निळ्या रंगाच्या कट वनपीसमधील बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. धनश्रीने शेअर केलेल्या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये धनश्री अतिशय सुंदर दिसत आहे. धनश्रीचा हटके लूक पाहून युझवेंद्र चहलने बायकोच्या फोटोंवर खास कमेंट केली आहे. “My Taj Mahal” अशी रोमॅंटिक कमेंट चहलने बायकोच्या फोटोंवर केली आहे.