‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल

'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट'कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल

Ganesh Festival: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ च्यावतीने यंदा गणेशोत्सवात (Ganeshotsav) विविध पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महिला आणि विद्यार्थ्यांच्या अथर्वशीर्ष पठणापासून तर रिल स्पर्धा आणि आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.

ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या कार्यक्रमांची माहिती दिली आहे. यामध्ये गणेश चतुर्थीला भव्य मिरवणुकीने या गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दुसऱ्या दिवशी पासून शालेय विद्यार्थ्यांच्या भेटी तसेच अथर्वशीर्ष पठण होणार आहे. यामध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत, गणेशोत्सवाच्या दहा दिवसात विविध नामांकित शाळांचे विद्यार्थी बापाच्या दर्शनासाठी येणार असून भाऊसाहेब रंगारी वाड्याला भेट देऊन स्वातंत्र्य लढ्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी दिलेले योगदान आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात यासंबंधीचा इतिहास समजून घेणार आहेत. गणेश भक्तांसाठी दि. २० ते २६ सप्टेंबर या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्त तपासणीपासून इतर अनेक तपासण्या करण्यात येणार आहेत, तसेच नेत्रदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय पहिल्या आठवड्यात रिल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, क्रांतिकारी भवनाचा इतिहास याचे रिल करणाऱ्यांना विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. दि. २५ सप्टेंबरला महिलांचे अथर्वशीर्ष पठण होणार यामध्ये जवळपास दोन हजार पाचशे पेक्षा अधिक महिला सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर दि. २६ सप्टेंबरला सायं. ६ ते रात्री ८ यावेळेत मुंबईच्या सुप्रसिद्ध चिंतामणी ग्रुपचे लाईव्ह बेंजो वादन होणार आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत विविध मान्यवरांच्या हस्ते रोज रात्रीची आरती होणार असून राजकीय, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनाला भेट देणार आहेत. अनेक भजनी मंडळ देखील या उत्सवात सहभागी होणार आहेत. अनंत चतुर्थदशीला भव्य विसर्जन मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

https://www.youtube.com/watch?v=h4yDr9dyH28&t=4s

Previous Post
“उदगीर नगरपरिषदे द्वारे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृत घनवन निर्मितीचा संकल्प"

“उदगीर नगरपरिषदे द्वारे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृत घनवन निर्मितीचा संकल्प”

Next Post
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

Related Posts
Summer Makeup Tips | उन्हाळ्यात तुमचा मेकअप वितळला तर या सोप्या टिप्स फॉलो करा, तुमचा लूक तासन्तास टिकून राहील

Summer Makeup Tips | उन्हाळ्यात तुमचा मेकअप वितळला तर या सोप्या टिप्स फॉलो करा, तुमचा लूक तासन्तास टिकून राहील

Summer Makeup Tips | उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्या असतात ज्यात पिंपल्स, फ्रिकल्स आणि टॅनिंग यांचा समावेश होतो.…
Read More
Assembly Elections MNS | विधानसभेत स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या मनसेची ताकद आणि कमकुबत बाजू कोणत्या?

Assembly Elections MNS | विधानसभेत स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या मनसेची ताकद आणि कमकुबत बाजू कोणत्या?

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर येत्या तीन महिन्यांनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections MNS) सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. राज्यात…
Read More