मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

Chandrashekhar Bawankule: विरोधकांच्या इन्डीया आघाडीने (India Alliance) देशातील काही नामांकित पत्रकारांवर बहिष्कार टाकणे हे त्यांच्या हुकुमशाही व राजेशाही वृत्तीचे प्रतिक असून याचा कितीही निषेध केला तरी तो कमीच असेल, अशी टिप्पणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. जनता त्याच्या या प्रवृत्तीला नक्कीच उत्तर देईल, असे ते म्हणाले.

ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. श्री बावनकुळे म्हणाले, आणीबाणीच्या काळातही असेच झाले होते. पत्रकारितेवर बंधने लावणे हे लोकशाहीला न मानण्यासारखे आहे.

• मराठवाड्याचा बॅकलॉग भरून निघणार
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात झाली याबद्दल त्यांनी सरकारचे अभिनंदन केले, हा आनंदाचा दिवस असून यामुळे मराठवाड्याचा बॅकलॉक कमी होण्याची सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे सरकारने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राची वैधानिक महामंडळे बंद करून अन्याय केला. जेव्हा जेव्हा भाजपातर सरकारे आली त्या प्रत्येकवेळी विकास थांबला. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून तेढ निर्माण केली. मतासाठी राजकारणात तुष्टीकरण केले. विकास हा विरोधकांच्या डायरीत नाही. विकासाची डायरी मोदीजींकडे आहे.

• ओबीसींचे आरक्षण कमी होणार नाही
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी संविधान चौकात सुरू असलेल्या सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समितीच्या धरणे आंदोलनाला भेट दिली. आंदोलकांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली. सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार असली तरी ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही, याविषयी सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी आंदोलकांना दिली. ओबीसी समाजाच्या मागे केंद्र व राज्य सरकारसह संपूर्ण भाजपा उभी असल्याचेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

https://www.youtube.com/watch?v=h4yDr9dyH28&t=4s

 

Previous Post
'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट'कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल

Next Post
Dhanashree Verma: माझी ताजमहल...; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

Dhanashree Verma: माझी ताजमहल…; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

Related Posts
नरेंद्र मोदींचे अहंकारी सरकार देशातील लोकशाहीला घातक :- नाना पटोले

नरेंद्र मोदींचे अहंकारी सरकार देशातील लोकशाहीला घातक :- नाना पटोले

मुंबई –  २०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात…
Read More
जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग अखेर मोकळा

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग अखेर मोकळा

Jayakwadi Dam:  अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला…
Read More
Anant-Radhika Sangeet Ceremony | अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत भारतीय क्रिकेटर्सचा जलवा, पण हार्दिकसोबत दिसली नाही नताशा

Anant-Radhika Sangeet Ceremony | अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत भारतीय क्रिकेटर्सचा जलवा, पण हार्दिकसोबत दिसली नाही नताशा

Anant-Radhika Sangeet Ceremony | भारतीय संघाने नुकतेच टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. आता चॅम्पियन टीमचे अनेक खेळाडू…
Read More