Asian Games: महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने पुन्हा उंचावली देशाची मान, जिंकले सुवर्णपदक

Asian Games – चीनमधे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची (Indian Players) पदकांची लयलूट कालही सुरूच होती. काल भारतीय खेळाडूंनी 15 पदकं पटकावली, यात तीन सुवर्णपदकांचा समावेश होता. पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात अविनाश साबळे (Avinash Sable) यानं नवा विक्रम नोंदवला. आठ मिनिटे आणि 19 पूर्णांक 53 सेकंदांची वेळ नोंदवत त्यानं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात तेजींदर पाल तूर यानं सुवर्ण पदकाची कमाई केली. तर महिलांच्या पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरमीलन बैंस हीनं रौप्यपदक पटकावलं. नेमबाजीत पुरुषांच्या सांघिक ट्रॅप प्रकारात भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावलं.

महिलांच्या वैयक्तिक गोल्फ प्रकारात, आदिती अशोक (Aditi Ashok) देशासाठी रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. भारतीय नेमबाजांनीही काल सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. नेमबाजीमध्ये भारतीय खेळाडूंनी देशाला सर्वाधिक म्हणजे 22 पदकं मिळवून दिली आहेत.

तर मुष्टियुद्धातल्या निखट झरीन ला 50 किलो श्रेणीमध्ये उपांत्यफेरीची लढत गमावल्याने कास्य पदकावर तर भारतीय पुरूष बँडमिंटन संघाला चीनकडून पराभव स्वीकारत रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.कालच्या आठव्या दिवस अखेर भारताच्या खात्यात 13 सुवर्ण, 21 रौप्य आणि 19 कास्य पदकांसह एकंदर 53 पदकं जमा झाली असून पदकतालिकेत भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या-
रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाविद्यालात होणार चक्क लावणीचा कार्यक्रम?

बाराही महिने चालणारे व्यवसाय, दर महिन्याला तगडी कमाई करुन देऊ शकतात ‘हे’ व्यवसाय

Bed Bugs: ढेकणांना त्रासलाय? ‘हे’ घरगुती उपाय करुन एका दिवसात पळवून लावा ढेकूण