रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाविद्यालात होणार चक्क लावणीचा कार्यक्रम?

अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात चक्क ‘महाराष्ट्राची लोकधारा लावणी’ चा कार्यक्रम होणार असल्याचे बॅनर समाज माध्यमात व्हायरल होत आहे. हाच बॅनर पोस्ट करत भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे (Sachin Potare) यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे.

आमदार महोदयांच्या बड्डेसाठी कर्जत (Karjat) शहरातील दादा पाटील महाविद्यालयातील (Dada Patil Collage) शारदाबाई पवार सभागृहात महाराष्ट्राची लोकधारा लावणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावरूनच नवा वाद निर्माण झाला आहे. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावणीचा कार्यक्रम घेणे हे कॉलेज प्रशासनाला पटतय का? सरकार काय कारवाई करणार असा सवाल पोटरे यांनी फेसबुक पोस्ट माध्यमातून केला आहे.

काय म्हटलंय फेसबुक पोस्टमध्ये?
‘रयतच्या जनरल बॉडी सदस्य असलेल्या आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या राजकारणाचा अड्डा केलेल्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी मागच्या आठवड्यात ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्यामुळे कॉलेज प्रशासनाने या सर्वांना दिवसभर अमानुषपणे डांबून ठेवून नापास करण्याची धमकी दिली. मात्र तिथेच आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावणीचा कार्यक्रम घेणे हे कॉलेज प्रशासनाला पटतंय का? सरकार काय कारवाई करणार? उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या शिक्षण संस्थेत चाललेला राजकिय हस्तक्षेप बंद करणार का? हे सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांना पडलेले प्रश्न आहेत. जय श्री राम‌‌ नाही तर लावणी पण नाही. Happy birthday आमदार साहेब..

महत्वाच्या बातम्या-

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

श्राद्ध पक्षात पितरांना तर्पण अर्पण करणे का आवश्यक आहे? जाणून घ्या पितृ पक्ष फक्त 16 दिवस का असतो?