Tejas Teaser : भारत को छेडोगे तो छोडेंगे नही; कंगनाच्या ‘तेजस’चा दमदार टीझर रिलीज

Tejas Teaser Out: कंगना राणौत (Kangana Ranaut) ही बॉलिवूडमधील सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगनाचा नुकताच हॉरर कॉमेडी ड्रामा फिल्म ‘चंद्रमुखी 2’ रिलीज झाला आहे. या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आता ‘तेजस’ (Tejas) चित्रपटात कंगना राणौत पहिल्यांदाच एअरफोर्स पायलटच्या (Airforce Pilot) भूमिकेत दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त निर्मात्यांनी कंगनाच्या ‘तेजस’ची पहिली झलक दाखवली असून या चित्रपटाचा दमदार टीझर आज रिलीज करण्यात आला आहे.

 

RSVP ने तयार केलेला तेजसचा टीझर खूपच पॉवरफुल आहे. टीझरच्या सुरुवातीला कंगना रणौत एअरफोर्स पायलटच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.  भारताला छेडले तर सोडणार नाही असा इशारा टीझरमध्ये कंगना देत आहे.सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित ‘तेजस’मध्ये कंगना रणौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर ट्रेलरसाठी चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. तेजसचा ट्रेलर 8 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

 

कंगना राणौत स्टारर ‘तेजस’ ची कथा हवाई दलातील वैमानिक तेजस गिलच्या विलक्षण प्रवासाभोवती फिरते. या चित्रपटात कंगनाने तेजस गिलची भूमिका साकारली आहे. आणि या चित्रपटाचा उद्देश प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणे आणि अभिमानाची भावना जागृत करणे हा आहे.

महत्वाच्या बातम्या-
रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाविद्यालात होणार चक्क लावणीचा कार्यक्रम?

बाराही महिने चालणारे व्यवसाय, दर महिन्याला तगडी कमाई करुन देऊ शकतात ‘हे’ व्यवसाय

Bed Bugs: ढेकणांना त्रासलाय? ‘हे’ घरगुती उपाय करुन एका दिवसात पळवून लावा ढेकूण