त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न; समाजकंटकावर कारवाई करण्याची अलई यांची मागणी

Nashik Trimbakeshwer Mandir :  त्र्यंबकेश्वर येथील (Trimbakeshwer) मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील (Trimbakeshwer Mandir) त्र्यंबकेश्वर मंदिरात काही समाजकंटकांनी बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने, यावरून तणाव निर्माण झाल्याचे समजते आहे.

सध्या पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला असला तरी, मंदिर प्रशासनाकडून या घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.भाजप प्रवक्ते प्रवीण अलई यांनी देखील या प्रकरणी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, या मागील सूत्रधार शोधून समाजकंटकावर कारवाई करण्याची त्यांनी देखील मागणी केली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू धर्मिंयांव्यतिरिक्त इतर कोणाचाही प्रवेश होत नाही हे ठाऊक असताना हे घडवून आणन्याचा उद्देश्य काय असावा.? याची तत्काळ दखल घेत कठोर कारवाई का झाली नाही? या प्रकरणात कुणाचा दबाव आहे का? या सारखे अनेक प्रश्न  प्रवीण अलई यांनी आपल्या ट्वीटमधून उपस्थित केले आहेत.

दुसऱ्या बाजूला या प्रकरानंतर सखोल चौकशी करून कारवाई करण्याची ब्राम्हण महासंघ, विश्वहिंदू परिषद नाशिक, यांनी मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा  इशारा सर्व हिंदी संघटनानी दिला आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.