आमच्या मंदिरात आमच्या धर्मिंयांव्यतिरिक्त इतर कोणाचाही प्रवेश आम्हाला मान्य होणार नाही – भोसले

Nashik Trimbakeshwer Mandir : त्र्यंबकेश्वर येथील (Trimbakeshwer) मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील (Trimbakeshwer Mandir) त्र्यंबकेश्वर मंदिरात काही समाजकंटकांनी बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने, यावरून तणाव निर्माण झाल्याचे समजते आहे.

दरम्यान, या घटनेवरून वातावरण तापले असताना आता भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात पुरातन काळापासून केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जातो ; तशी स्पष्ट सूचना उत्तर दरवाजावर लावलेली आहे. तरीदेखील १३ मे च्या रात्री काही मुस्लिमांनी प्रवेशाचा प्रयत्न केला ; यावर पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी.आमच्या मंदिरात आमच्या धर्मिंयांव्यतिरिक्त इतर कोणाचाही प्रवेश आम्हाला मान्य होणार नाही. असं आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे.