विश्वचषकाच्या इतिहासातील ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँडचा ३०९ धावांनी केला पराभव

AUS vs NED Match Report: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) 24 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा 309 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 8 विकेट गमावून 399 धावा केल्या आणि नेदरलँडला विजयासाठी 400 धावांचे लक्ष्य दिले.

कांगारू संघाकडून डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांनी शानदार शतके झळकावली. यानंतर दिल्लीच्या मैदानावर ग्लेन मॅक्सवेलचे तुफान आले, ज्याने 40 चेंडूत विक्रमी शतक झळकावले. ग्लेन मॅक्सवेल आता विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे.

ग्लेन मॅक्सवेलने विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावले
वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघाच्या वतीने (AUS vs NED) ग्लेन मॅक्सवेलने शानदार फलंदाजी केली आणि विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले. मॅक्सवेलने शानदार फलंदाजी करत अवघ्या 40 चेंडूत शतक झळकावले. यादरम्यान त्याने अॅडम मार्करामचा विक्रम मोडला.

ग्लेन मॅक्सवेलने 44 चेंडूत 9 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 106 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 399 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावताना अॅडम मार्करामला मागे टाकले. मार्करामने 2023 विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 49 चेंडूत शतक झळकावले होते.

अॅडम झम्पानेही केली कमाल
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 399 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 20.5 षटकांत 90 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने केवळ 8 धावा देत 4 बळी घेतले.

https://youtu.be/Tt-1tSruXa0?si=kwbpullEutXoNovU

महत्वाच्या बातम्या-

‘उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता’

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला क्लिन बोल्ड केल्यानंतर शोरिफुलचे हृतिक स्टाईल सेलिब्रेशन, Video Viral

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल