बॅट आहे की धावांची मशिन? Glenn Maxwellने ४४ चेंडूतच ठोकले विश्वचषकातील सर्वात जलद शतक

Fastest World Cup Century Glenn Maxwell: ग्लेन मॅक्सवेलने दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध धुमाकूळ (Australia vs Netherland) घातला आहे. मॅक्सवेलने तुफानी फलंदाजी करत विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक (Glenn Maxwell Century) झळकावले. स्फोटक पद्धतीने खेळत मॅक्सवेलने अवघ्या 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मॅक्सवेलने अॅडम मार्करामचा विक्रम मोडीत काढला आहे.

मॅक्सवेलने सर्वात वेगवान शतक झळकावले
मार्नस लॅबुशेन बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने बॅटने कहर केला. मॅक्सवेलने मैदानात पाऊल ठेवताच चौकार आणि षटकार ठोकले. स्फोटक पद्धतीने खेळणाऱ्या कांगारू फलंदाजाने अवघ्या 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर मॅक्सवेलने खऱ्या अर्थाने आपली ताकद दाखवून दिली आणि पुढच्या 13 चेंडूत पुढचे अर्धशतक झळकावले.

मॅक्सवेलने अवघ्या 40 चेंडूत आपले शतक पूर्ण (World Cup Fastest Century) केले. ऑस्ट्रेलियन फलंदाजाने अवघ्या 44 चेंडूत 106 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान मॅक्सवेलने 9 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार ठोकले. म्हणजेच मॅक्सवेलने केवळ चौकार आणि षटकारांसह 84 धावा केल्या. मॅक्सवेलच्या झंझावाती खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 8 गडी गमावून 399 धावा केल्या.

मार्करामचा विक्रम मोडला
ग्लेन मॅक्सवेलने वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याच्या बाबतीत अॅडम मार्करामला मागे टाकले आहे. मार्करामने या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळताना 49 चेंडूत शतक झळकावले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर केविन ओब्रायनचे नाव आहे, ज्याने 50 चेंडूत ही कामगिरी केली. त्याचबरोबर मॅक्सवेलने 2015 च्या विश्वचषकात 51 चेंडूत शतक झळकावले होते.

https://youtu.be/Tt-1tSruXa0?si=kwbpullEutXoNovU

महत्वाच्या बातम्या-

‘उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता’

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला क्लिन बोल्ड केल्यानंतर शोरिफुलचे हृतिक स्टाईल सेलिब्रेशन, Video Viral

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल