Ashish Shelar | एक खोट बोलल्यामुळे शंभर खोटे बोलावे लागतेय, शेलार यांचा ठाकरेंना टोला

Ashish Shelar |  उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एक खोटे बोलल्यामुळे त्यांना आता शंभर वेळा खोटे बोलावे लागते आहे, असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता अशा आशयाचे विधान उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले होते त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, गेले दोन चार वर्षे उध्दवजी म्हणत होते की, मी आणि अमितशाह यांच्यात चर्चा झाली. अमितशाह यांनी मला मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिला होता, असा दावा त्यांनी केला होता. तर आता त्यांनी दुसरा दावा केला आहे की, माझी आणि देवेंद्रजींची चर्चा झाली. वर्षानुवर्षे दावे ते बदलत आहेत.

तशी कोणतीही चर्चा झाली नाही हे अमितभाई शाह यांनी स्पष्ट केले त्यामुळे उध्दव ठाकरे यांचे हे खोट विधान ना जनतेला पटले, ना शिवसैनिकांना पटले, त्याचा पुरावा ही त्यांच्याकडे नाही त्यामुळे आता ते आणखी एक खोटे बोलत आहेत. माझी आई मला सांगत असे की, खोटे कधी बोलू नको, एक खोटे बोलले की पुढे शंभर खोटे बोलावे लागते. उध्दव ठाकरे आपले एक खोटे पचवण्यासाठी आणखी एकदा खोटे बोलले आहेत. आणखी त्यांना कितीवेळा खोटे बोलावे लागणार आहे असा प्रश्न आहे.

दुसरा महत्वाचा मुददा म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, पुत्र प्रेमातून शिवसेनेत फुटली. आज याला पुष्टी मिळाली असून शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदी बसवायचे आहे असे उध्दव ठाकरे बोलत जरी असले तरी प्रत्यक्षात आदित्यलाच मुख्यमंत्री करायचे पोटात होते, त्यांच्या मनातील चांदणे आता समोर आले आहे, असेही आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा