तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Shiv Sena Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : 57 वर्ष झाली पंरपरा थांबू दिली नाही. मोडता घालण्याचा प्रयत्न झाला. पण मोडता मोडित काढून परंपरा कायम ठेवली आहे. यंदा खोकासूराचे दहन करणार आहोत.  तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे असं म्हणत  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिंदे गटासह सरकारवर जोरदार निशाणा साधला.

ठाकरे म्हणाले, प्रभू श्री रामचंद्रांनी धनुष्यबाणाने रावणाचा वध केला. भानगड नको म्हणून यांनी धनुष्यबाण देखील चोरला आहे. खोक्याची लंका दहन करणाऱ्या धगधगत्या मशाली माझ्या सोबत आहेत. सध्या क्रिकेटचा मौसम सुरु आहे. तिकडे 3 हिरो जाहिराती करत आहेत.  हे कमला पसंद वाले अशी जाहिरात करतात. तर आमच्याकडे कमळा पसंद वाले आहेत. पसंद अपनी अपनी अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे गटावर, नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर घणाघाती टीका केली आहे.  रामाने रावणाचा वध का केला? कारण मी ऐकलं आहे की रावणही शिवभक्त आहे. तरीही रामाला त्याला मारावं लागलं कारण रावण माजला होता. रावणाने सीतेला पळवलं होतं. त्याचप्रमाणे आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतो आहे. एक खबरदारी त्यांनी घेतली आहे की त्यांनी आपला धनुष्यबाणही चोरला आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांवर टीका केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=Tt-1tSruXa0&t=10s