Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol murder – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ(gangster Sharad Mohol) याची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शरद मोहोळवर 3 ते 4 अज्ञातांनी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली.

गोळीबारात शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे. शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता. या खून प्रकरणात त्याला अटक झाली होती. या खटल्यात जामीन त्याला मिळाला. त्यानंतर दासवे येथील सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.

मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव यांच्यावर जून 2012 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी याचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र या आरोपातून मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतरही त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. यामुळे जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले होते.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात