Video: प्रभू श्रीरामांच्या भक्तीत रमले ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहते, लगावले ‘जय श्री राम’चे नारे

Australian Fans Raised Slogans of Jai Shri Ram: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाबाबत (ICC ODI World CUP 2023) चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. विश्वचषकातील प्रत्येक सामन्यात विक्रम होत आहेत. या विश्वचषकात भारताचीही चांगली कामगिरी होताना दिसत आहे. विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) एकतर्फी पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारताने आपला विजय कायम राखत अफगाणिस्तानचा (india vs Afghanistan) पराभव केला. या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहते जय श्री राम आणि भारत माता की जयच्या घोषणा देत असल्याचे दिसत आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यातील विश्वचषकातील दहावा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतील चाहते मोठ्या संख्येने येत आहेत. या सामन्यादरम्यानच एक अशी घटना घडली, ज्याला पाहून भारतीय लोक खूप खूश आहेत. ऑस्ट्रेलियन समर्थकांनी स्टेडियमबाहेर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. चाहत्यांनी मोठ्याने भारत… भारत… असा जयघोष केला.

8 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक सामना खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना जिंकून 2 गुण मिळवले आहेत. त्याचवेळी, ऑस्ट्रेलिया अजूनही विश्वचषकातील पहिल्या विजयाचा शोध घेत आहे. यानंतर भारताने दुसरा सामना जिंकून विश्वचषक ट्रॉफीवर आपला दावा भक्कमपणे मांडला आहे. दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारत विश्वचषकाच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या-

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Navratri : राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

मुंबई भाजपकडून ‘वाघ नखांच्या निमित्ताने’ कार्यक्रमाचे आयोजन