Pak विरुद्धच्या सामन्यापेक्षा आई महत्त्वाची! हायव्होल्टेज लढतीपूर्वी बुमराहचे भावनिक विधान

IND vs PAK World Cup: भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्यापूर्वी सांगितले की, त्याच्या आईला (Jasprit Bumrah Mother) भेटणे हे त्याचे मोठे प्राधान्य आहे. बुमराह 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धचा सामना अहमदाबादमध्ये 132000 चाहत्यांसमोर खेळणार आहे.

29 वर्षीय जसप्रीत बुमराह म्हणाला की, त्याच्यासाठी कोणत्याही गोष्टीच्या आधी कुटुंब आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या चमकदार कामगिरीनंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, “मी काही काळ घरापासून दूर आहे. परंतु आता माझ्या घरी आईला पाहून मला खूप आनंद होईल.” बुमराहचे वडील तो 5 वर्षांचे असताना वारले. यानंतर बुमराहची आई दलजीत यांनीच त्याला लहानाचे मोठे केले. दलजीत या व्यवसायाने शाळेच्या मुख्याध्यापक होत्या.

आईला भेटण्यासाठी उत्सुक असलेला बुमराह म्हणाला, “मी जाऊन आईला भेटेन. हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. मी अहमदाबादमध्ये एकदिवसीय क्रिकेट खेळलो नाही, पण अहमदाबादमध्ये कसोटी सामना खेळलो आहे. इथलं वातावरण छान असणार आहे. हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील याची मला खात्री आहे. त्यामुळे येथील सामना छान होणार आहे. आशा आहे की मी माझी सर्वोत्तम कामगिरी करेन.”

महत्वाच्या बातम्या-

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Navratri : राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

मुंबई भाजपकडून ‘वाघ नखांच्या निमित्ताने’ कार्यक्रमाचे आयोजन