किल्ले वाफगावच्या संवर्धन कार्यासाठी भूषणसिंहराजे होळकर यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर

Pune –  हिंदवी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेहण्यामध्ये होळकर घराण्याचे मोलाचे योगदान आहे. या पराक्रमी होळकर घराण्याचे वाफगाव (ता. खेड, जिल्हा- पुणे) हे मूळ गाव. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी वाफगाव ला हा भव्य भुईकोट किल्ला उभारला. भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) ज्यांची तुलना फ़्रान्स च्या नेपोलियन शी होते, यांचा जन्म याच किल्ल्या मधे 3 डिसेंबर 1776 रोजी झाला.

या किल्ल्याला 7 भव्य दगडी बुरुज असून मुख्य किल्ल्या मध्ये भव्य प्रवेश द्वार, राणी महाल, विंष्णु पंचायतन, बुरुजातील विहीर, राजसदर, पश्चिम द्वार, भूमिगत खलबतखाने, होळकर कालीन तोफा अश्या अनेक सुंदर वास्तू आज ही होळकरशाही ची साक्ष देत दिमाखात उभ्या आहेत..सध्या किल्ल्या मध्ये रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे.
किल्ल्याचे जतन संवर्धन व्हावे, ही लोक भावना आहे. यामुळे वाफगाव व परिसराचा विकास होईल, येणाऱ्या पिढ्याना तो प्रेरणा देत राहावा या साठी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर हे अनेक वर्षां पासून प्रयत्न करत होते. ते स्वतः वास्तू विशारद असून किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचा आराखडा त्यांच्या टीम ने तयार केला आहे.

राजेंच्या या प्रयत्नाला यश येत त्यांच्या विनंती मुळे मा. उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजीतदादा पवार यांनी किल्याच्या संवर्धनासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या व आता संवर्धन कार्यासाठी पहिल्या टप्प्या मध्ये 7.20कोटी चा निधी मंजूर झाला असून त्याचे टेंडर ही निघाले आहे. या मुळे वाफगाव किल्ल्याच्या संवर्धनाचा मार्ग आता मोकळा आहे. येत्या 06 जानेवारी ला महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन किल्ले वाफगाव येथे परंपरे प्रमाणे साजरा होणार आहे. तेव्हा पासून संवर्धन कामाला सुरवात होणार असल्याचे राजेंनी सांगितले.

शरद पवार साहेब व  अजित दादा यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या रयत च्या council body मीटिंग मध्ये रयत ने ही संवर्धन कार्यास मंजुरी दिली आहे. किल्ल्या मधील शाळाही लवकर स्थलांतरीत करण्यासाठी प्रयात्न चालू आहेत. पण तो पर्यंत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ न देता शाळेच्या वापरातील इमारती वगळून संवर्धन कार्यास सुरवात करण्यात येणार आहे असं राजे म्हणाले.

किल्याचे ऐतिहासिक महत्व व जण भावना लक्षात घेऊन मा. अजितदादांनी या कार्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल राजेंनी त्यांचे आभार मानले व या कार्यासाठी वेळो वेळी सहकार्य करणाऱ्या मा मंत्री हसन मुश्रीफ साहेब, खेड चे आमदार दिलीप मोहिते, पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वहाने, वाफगाव ग्रामस्थ व सर्व होळकर प्रेमींचे, लोक प्रतिनिधी यांचे राजेंनी आभार मानले व अभिनंदन केले.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले