बाबा वेंगानी भारताबाबत केली होती मोठी भविष्यवाणी, २०२३ मध्ये ही गोष्ट खरी ठरली तर होऊ शकतो विनाश!

अलीकडेच तुर्कस्तान आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे आतापर्यंत ४० हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपासारखाच भूकंप आशियामध्येही होऊ शकतो असे सांगण्यात येत असून भारताबाबतही एक महत्त्वाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे भाकीत बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी केले होते.

बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाणीसाठी (Baba Vanga Predictions) जगभर प्रसिद्ध आहेत. त्याचे बहुतेक अंदाज खरे ठरले आहेत. २०२३ मध्ये त्यांनी भारतासाठी एक महत्त्वाची भविष्यवाणीही केली होती. १९९६ मध्ये बाबा वेंगाचे निधन होऊनही, बाबा वेंगा यांचे भाकीत अजूनही खरे ठरत असल्याचे अनेकांना आश्चर्य वाटते.

तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपाच्या काही दिवसांपूर्वी नेदरलँडचे संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी तुर्कस्तान आणि सीरियाच्या आसपासच्या भागात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती आणि त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्याचवेळी नैसर्गिक आपत्तींचाही अंदाज बाबा वेंगा यांनी दिला होता. बाबा वेंगा यांनी २०२३ मध्ये अनेक भयानक नैसर्गिक आपत्तींचे भाकीत केले आहे.

बाबा वेंगा यांनी आधीच भाकीत केले आहे की, आशियातील कोणत्यातरी देशात अणुस्फोट होईल, त्यामुळे भारताचे मोठे नुकसान होईल. पृथ्वीवर एक मोठी भूवैज्ञानिक घटना घडेल, ज्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत बदल होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल. पृथ्वीच्या कक्षेत बदल झाल्यास पृथ्वीवर भयानक भूकंप होतील. अशा परिस्थितीत त्या भूकंपाच्या तडाख्यात कोणता देश येतो, हा चिंतेचा विषय ठरणार आहे. यासोबतच बाबा वेंगा यांनी २०२३मध्ये सौर त्सुनामीचीही भविष्यवाणी केली आहे.