राष्ट्रवादीलाही पडणार मोठं खिंडार ? दोन मातब्बर नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट

सोलापूर : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता आधी शिवसेना (Shiv Sena) आणि आता शिवसेनेचा अत्यंत जाव्लाग मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला देखील धक्के बसू लागले आहेत. राज्यभरातून शिवसेनेतील अनेक नेते बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे घेवून जात असल्याचे चित्र असताना आता  सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला (NCP) मोठे खिंडार पडले असल्याचे बोलले जात आहे.

माजी आमदार राजन पाटील आणि आमदार बबन शिंदे (Rajan Patil and Baban Shinde) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी ज्यावेळी एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतली, यावेळी राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीचे (NCP) अध्यत्र शरद पवार (Sharad Pawar) यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी बैठक घेतली होती. त्याच्या दोन दिवसांनी राजन पाटील दिल्लीत गेले आहेत, त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये मोठे खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे.