भर उन्हाळ्यात पाकिस्तानात पावसाचा कहर, 22 मुलांसह 35 जणांचा मृत्यू, अनेक घरे कोसळली

Pakistan Rain Snowfall : भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये एकीकडे बर्फवृष्टी आणि पावसाने कहर केला तर दुसरीकडे भूस्खलनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. पाऊस आणि वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत पाकिस्तानी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, सतत पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे 35 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पाकिस्तान हवामानशास्त्र विभागाचे माजी संचालक मुश्ताक अली शाह म्हणाले की, हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ गारपीट झाली तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. अशा स्थितीत साधारणत: मार्च महिन्यात हवामान उष्ण असते, मात्र यावेळी मात्र थंडी आहे.

पाकिस्तानच्या अनेक भागात मुसळधार पाऊस
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात 48 तास सतत पाऊस पडत असल्याने अनेक जिल्हे जलमय झाले आहेत. वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतात भूस्खलन झाल्यामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आणि रस्ते अडवले. पाऊस आणि भूस्खलनामुळे 35 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 22 मुलांचा समावेश आहे.

पावसाच्या पाण्यात घरे बुडाली
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसाच्या पाण्यात 150 घरे बुडाली आहेत, तर 500 हून अधिक घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीचा सर्वाधिक परिणाम खैबर पख्तुनख्वा आणि दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतात दिसून आला आहे. या आठवड्यातही बलुचिस्तान आणि काश्मीरच्या काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता पाकिस्तानच्या हवामान खात्याने वर्तवली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’

‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन