भोंग्याचा वाद :  मुंबईतील २६ मशिदींच्या इमामांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

मुंबई – राज्यात सध्या भोंग्यांचा (Loudspeaker) मुद्दा चर्चेत असून मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी यावरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.सामान्य नागरिक, महिला, विविध पक्ष आणि संघटनांचा राज ठाकरे यांना पाठींबा (Support) मिळत असताना आता जुन्या शिवसैनिकांचा देखील राज ठाकरे यांना पाठींबा असल्याचे समोर येत आहे. याशिवाय अनेक मशिदींमध्ये भोंग्या शिवाय अजान दिली जात आहे.

दरम्यान, मुंबईतील २६ मशिदींच्या (26 Masjid) इमामांनी सकाळची नमाजसाठी भोंगा न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री दक्षिण मुंबईत (South Mumbai) जवळपास २६ मशिदींच्या इमामांची बैठक झाली. या बैठकीत भोंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. दक्षिण मुंबईतील २६ मशिदींच्या इमामांची बैठक झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreem Court) आदेशाचं पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आदेशानुसार सकाळची नमाज भोंग्यांशिवाय करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुन्नी बडी मशिदमध्ये ही बैठक पार पडली.

या बैठकीला भायखळातील मदनपुरा, नागपाडा आणि अग्रीपाडा भागातील मशिदींचे इमाम उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रात्री १० वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत या भोंग्यावरून अजान केली जाणार नाही. मुंबईतील प्रसिद्ध मिनारा मशिदीत (Minara Masjid) या निर्णयाचं पालन केल्याचं दिसलं. मशिदीत आज सकाळची नमाज भोंग्याशिवाय झाली.