शरद पवार यांना भेटण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे बंडखोरांशी तडजोड करण्यास तयार होते – दिपक केसरकर

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर आमदार दीपक केसरकर (Rebel MLA Deepak Kesarkar) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) जोरदार टीका केली आहे. चुकीच्या सल्लागांरामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. पक्षाला चांगल्या सल्लागाराची आवश्यकता असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. पक्षात शांत लोक देखील आहेत, मात्र त्यांचं कितपत ऐकले जाते ही मी सांगू शकत नसल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे बंडखोरांशी तडजोड करण्यास तयार होते असेही दिपक केसरकर यांनी म्हटले आहे.