मुंबईत शिंदेंची ताकत वाढली, ‘या’ नेत्याने केला आता शिवसेनेत प्रवेश

Mumbai – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९९ चे माजी नगरसेवक संजय गुलाबराव अगलदरे (Sanjay Gulabrao Agaldare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.याप्रसंगी त्यांच्या समवेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता. या सर्वांचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी आ. संजय शिरसाठ, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, सुशांत शेलार, प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे उपस्थित होते.