पंजाबमध्ये कॉंग्रेसची मोठी राजकीय खेळी ! ‘या’ कारणांमुळे सिद्धूला डावलून चन्नीला केलं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये अनेक घडामोडींना वेग आला आहे. कँप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर दरम्यान पंजाबमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. सुरूवातीपासून माजी पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहिलं जायचं. परंतु कॉंग्रेसने मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.

कँप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्री पद काढून घेतल्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे पद सोपविण्यात आलं. त्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पंजाब कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांनी शेवटपर्यंत कॉंग्रेससोबत राहत असल्याचं सांगितल्याने त्यांच्यातील दरी मिटली. परंतु सध्या पंजाब कॉंग्रेस मध्ये दोन गट निर्माण झाल्याचं दिसत असल्यानं चरणजीत सिंग चन्नी यांनाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केल्याने मोठी राजकीय खेळी कॉंग्रेसने पंजाब मध्ये खेळल्याचं दिसत आहे.

मागील काही दशकांपासून पंजाबमधील राजकारण हे दलित मतदारांभोवती फिरत आहे. चेन्नींना पुढे करण्याचं कारणही तसंच असल्याचं बोलण्यात येत आहे. तसं पाहिलं तर पंजाबमध्ये २०११ च्या जनगणननेनूसार पंजाबची लोकसंख्या २ कोटी ७७ लाख आहे यापैकी ३१.९ टक्के लोकसंख्याही दलित आहे. यात दलित हिंदूची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.

पंजाबमध्ये जी लोक चामड्याचा व्यवसाय करतात. त्यामध्ये रामदासी आणि अदधर्मी दलित शिखांचा कल हा चन्नी यांच्याकडे असल्याचं दिसून येतं. तर मजहबी शिखांचा कल कॉंग्रेस आणि शिरोमणी अकाली दल अशा दोन्ही बाजूंनी झुकलेला दिसतो. याशिवाय इतर समाजातील लोकांचा कल देखील हा कॉंग्रेसकडे असल्याचं दिसून येत आहे.