Ravindra Dhangekar | गेल्या १० वर्षात नवी गुंतवणूक न झाल्याने पुण्यात तरुणांच्या बेकारीचा मोठा प्रश्न

Ravindra Dhangekar | काँग्रेस राजवटीत पुण्यामध्ये फार मोठी गुंतवणूक वाढली. काँग्रेस पक्षाने पुण्याला आयटी सिटी केले, वाहन उद्योग निर्मितीचे केंद्र बनवले. त्यामुळे शेकडो देशी परदेशी कंपन्यांनी पुण्यात गुंतवणूक केली व लाखो नवे रोजगार पुण्यात काँग्रेस राजवटीत निर्माण झाले. गेल्या १० वर्षात मात्र केंद्रात, राज्यात व पुण्यात भाजप सरकार असूनही पुण्यात कोणतीही नवी गुंवणूक त्यांनी आणली नाही. त्यामुळे गेल्या १० वर्षात लाखो तरुण – तरुणींच्या, नोकरी – रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या साठीच आता परिवर्तन आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी पंजाच्या चिन्हापुढील बटन दाबून काँग्रेसला विजयी करा असे आवाहन महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केले. कसबा विधानसभा मतदार संघातील सकाळी झालेल्या भव्य पदयात्रेनंतर ते बोलत होते.

ही पदयात्रा शहराच्या मध्य भागातील दाट वस्तीतून जाताना अनेक गणेशोत्सव मंडळे व व्यापाऱ्यांनी धंगेकरांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेतील नागरिक व कार्यकर्त्यांना उत्स्फूर्तपणे पाणी दिले जात होते. मागार्वरील अनेक मंदिरांमध्ये व गुरुद्वारात जाऊन उमेदवार धंगेकर यांनी दर्शन घेतले. तसेच ठिकठिकाणी हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले. मोतीचौक आणि गणेशपेठ गुरुद्वारा जवळील हनुमान मंदिर येथे जाऊन त्यांनी श्री हनुमानाचे दर्शन घेतले. साखळी वीर तालीम येथे जाऊन त्यांनी प्रथम हनुमानाच्या प्रतिमेस वंदन करून तालमीतील पैलवानांची भेट घेतली. तसेच आखाड्यात उतरून आखाड्यातील माती हातात घेऊन ती आखाड्यात अर्पण केली. पैलवानांनी रवींद्र धंगेकर यांना दिलेली मुदगल हातात घेऊन त्यांनी प्रत्येक पैलवानाला प्रोत्साहन दिले. तेव्हा जयजयकाराच्या घोषणाही चालू होत्या.

मागील वर्षी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीतील आठवणींना अनेक जण उजाळा देत भक्कम पाठिंब्याची खात्री देत होते. जुन्या वाड्यांमधील नागरिकही मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन स्वागत करत होते तसेच महिला देखील मोठ्या प्रमाणात येऊन धंगेकरांचे औक्षण करीत होत्या. अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले गेले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा