‘महाराष्ट्रात 3 पत्रकार आहेत, जे त्यांच्या संस्थेकरिता काम करत नाहीत तर राजकीय नेत्यांकरिता काम करतात’

मुंबई : राज्यात सध्या फॉक्सकॉन प्रकल्पावरून (Foxconn project) राज्यात वातावरण तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर आणि काही पत्रकारांवर टीका केली आहे.

फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावर भाष्य करताना फडणवीस यांनी राजकीय विरोधकांवर तर टीका केली मात्र मान न घेता काही पत्रकारांवर देखील शरसंधान केले. मी सगळे पत्रकार म्हणणार नाही पण महाराष्ट्रात 3 पत्रकार आहेत, जे त्यांच्या संस्थेकरिता काम करत नाहीत तर ते त्यांच्या राजकीय नेत्यांकरिता काम करतात.असं म्हणत पत्रकारांना चिमटा काढला.

सत्ता आल्यानंतर फडणवीस यांनी वेदांता प्रकल्पाबाबत माहिती घेतली तेव्हा खूप उशिर झाला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनेच वेळकाढूपणा केल्याने हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. शिवाय तो महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पण उशिर झाला होता असे फडणवीस म्हणाले आहेत.