उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठांतर कर; व्यंगचित्रातून शिवसेनेला चिमटे 

मुंबई : हिदुत्वांचा हुंकार ऐकायला यायला पाहिजे, असं म्हणत शिवसेनेने (shivsena) कार्यकर्त्यांना साद घातली आहे. येत्या 14 तारखेला मुंबईतील बीकेसी मैदानात (BKC ground)  शिवसेना शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS president Raj Thackeray)  आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे.

गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. महापालिकेत सुरु असलेला भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपनेही पोलखोल सभा घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुकलं आहे. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि  शिवसेना सज्ज झाली आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून एका बाजूला या सभेची जोरदार तयारी सुरु असताना दुसऱ्या बाजूला  मुंबई भाजपने एक व्यंगचित्र ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे… असा मथळा या व्यंगचित्राला देण्यात आला आहे. त्यानंतर खुर्चीवर शरद पवार बसलेले दाखवण्यात आले आहेत. ते उद्धव ठाकरेंना म्हणत आहेत उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठांतर कर त्यावर उद्धव ठाकरे वाकून होय साहेब असं म्हणताना दाखवले आहेत.

या व्यंगचित्रात एका कोपऱ्यात सोनिया गांधींचाही फोटो दाखवण्यात आला आहे. तर टीव्हीवर मुख्यमंत्र्यांची सभा हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला यायलाच पाहिजे अशी ब्रेकिंग न्यूज सुरू असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या टीव्हीचा रिमोट शरद पवारांच्या हाती आहे आणि उद्धव ठाकरेंच्या हाती भाषणाची कॉपी दाखवण्यात आली आहे.