आमच्या मोठ्या महाराजांना त्रास देणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशासाठी ? 

पुणे – काल एमआयएमचे नेते  अकबरुद्दीन औवेसी (MIM leader Akbaruddin Owaisi) औरंगाबादच्या दौऱ्यावर  होते . या दौऱ्यादरम्यान त्यांनी  शहरातील धार्मिळ स्थळ आणि दर्ग्यांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी  स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या मुगलसम्राट औरंगजेबच्या (Aurangzeb)  कबरीवर फुले वाहिली आणि ते नतमस्तक झाले. (Akbaruddin Owaisi at the tomb of Aurangzeb)

सुरुवातीला त्यांनी एका मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ), एमआयएम नेते वारीस पठाण आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले. कबरीवर फुलं वाहून ( Owesani laid flowers at Aurangzeb’s tomb ) पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्त झाले.

दरम्यान, स्वराज्याच्या शत्रूचे उदात्तीकरण केल्याने ओवेसी आणि त्यांच्या पक्षावर आता टीका होत आहे. हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणाले, औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशासाठी ? आमच्या मोठया महाराजांना त्रास देणाऱ्या, संभाजी राजांना ठार मारणाऱ्या, छत्रपतींच्या पूर्ण परिवारालाच शत्रू समजणाऱ्या, आमच्या दैवतांवर कुऱ्हाड चालवणाऱ्या राज्याच्या सर्वात मोठ्या शत्रूची कबर इथे हवीच कशासाठी ? त्याला पाया पडणे चांगले का वाईट यावर चर्चाच कशी होऊ शकते ?

कसाब, अफझलगुरु, यासिन मलिक यांचा औरंगजेब हा पूर्वज होता… त्याला या मातीत स्थान देण्याची गरजच नाही. त्याला पाया पडणं हे हिंदूंना डिवचण्यासाठीच आहे हे आम्हाला कळत आहे. पानिपत च्या शत्रूची कबर एकेकाळी मराठ्यांनी फोडली होती, हे कर्तृत्व महाराष्ट्र ने लक्षात ठेवावे. मंदिरात इफ्तार झाडणाऱ्याच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांचे नेते आत्ता गप्प का आहेत ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.