भाजपनं सोलापूरच्या जिल्हाध्यक्षाला पदमुक्त केलंय, महिलेनं तक्रार दिल्यास कारवाई होणार – वाघ

सोलापूर : हनीट्रॅपमध्ये अडकलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूर (Solapur) (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resign) दिला आहे. नुकताच देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तातडीने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार श्रीकांत देशमुख यांच्याकडे होता. बेडरुममधील व्हिडिओ आणि तक्रारींनंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, यातील संबंधित महिलेनं तात्कळ पोलिसांत तक्रार द्यावी योग्य कारवाई होईल, असं मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी श्रीकांत देशमुख यांनी त्यांच्या पदावरून मुक्त केलंय, अशी पोस्ट चित्रा वाघ यांनी टाकलीय. त्यात त्यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचं पत्र जोडलं. त्या पत्रात भाजपचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष (Solapur Rural District President) श्रीकांत देशमुख यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मी स्वीकारला आहे. जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरता पदभर सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख (Vikram Deshmukh) यांच्या सोपवित आहे, असं पाटील यांच्या पत्रात आहे.