भाजप नेते तजिंदर पाल सिंह बग्गा यांना पंजाब पोलिसांकडून अटक

 नवी दिल्ली – भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा(Tajinder bagga) यांना पंजाब पोलिसांनी(punjab police) अटक केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Delhi cm Arvind kejriwal) यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर दिल्ली भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांच्या विरोधात पंजाबमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ( Punjab Police ) त्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलीस यापूर्वी त्यांच्या अटकेसाठी आले होते असही यावेळी म्हटले आह.

बग्गा यांच्याविरोधात १ एप्रिल रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. पंजाब पोलिसांनी प्रक्षोभक विधाने करणे, शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे आणि गुन्हेगारी धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ( Tajinder Bagga Arrested ) यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘द कश्मीर फाइल्स'(the kashmir files) चित्रपटावरील वक्तव्यावर दिल्ली भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांनीही हल्लाबोल केला होता त्यावरून ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, तजिंदर बग्गा यांना घेऊन जाणाऱ्या पंजाब पोलिसांच्या ताफ्याला हरियाणामध्ये(hariyana) रोखण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता तजिंदर बग्गाला दिल्लीत परत आणले जाऊ शकते. पंजाब पोलिसांचे वाहन कुरुक्षेत्र(kurushetra), हरियाणात सध्या थांबवण्यात आले आहे.