Uddhav Thackeray | मंत्री असून देखील शिंदेंना झेडप्लस सुरक्षा नाकारली, शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

मुंबई | महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्येष्ठ सहकारी आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा जीव धोक्यात असताना झेड प्लस सुरक्षा का नाकारली? असा सवाल शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी आज केला. एकनाथ शिंदे यांनी मागणी करुन देखील त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारणे म्हणजे यातून त्यांचा घात करण्याची उद्धव ठाकरे यांची प्रवृत्ती दिसून येते, असा आरोप वाघमारे यांनी केला.

नगरविकास मंत्री आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका होता, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा का नाकारली याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला द्यायला हवे, अशी मागणी डॉ. वाघमारे यांनी केली. स्व:ताच्या पक्षातील एक ज्येष्ठ सहकारी सुरक्षेची मागणी करतो आणि कुंटुंबप्रमुख म्हणवणारे उद्धव ठाकरे ती नाकारतात याला स्वपक्षीयांसोबत केलेली गद्दारी का म्हणू नये, अशी टीका डॉ. वाघमारे यांनी केली.

गद्दार म्हणून आरोप करण्यापूर्वी नकली शिवसेनेने गद्दार शब्द स्व:ताशी किती निगडीत आहे, याचा विचार करावा. शिवसेनेतील झालेले बंडाची सुरुवात खूप आधीपासून झाली त्यामुळे हे एकाच रात्रीत घडलेले नाही. या बंडाला त्यावेळचे शिवसेनेचे नेतृत्व कारणीभूत आहे, असे आरोप डॉ. वाघमारे यांनी केला. यापुढे उबाठा गटाबाबत आणखी गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा डॉ. वाघमारे यांनी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका