जेव्हा अँम्बुलन्समधून विधानभवनात पोहोचले होते लक्ष्मण जगताप, फडणवीसांनी ‘लढवय्ये’ म्हणत केले होते कौतुक

पुणे: पिंपरी चिंचवडमधून अतिशय दुख:द बातमी पुढे येत आहे. चिंचवडचे भाजपा आमदार (BJP MLA) लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे आज सकाळी निधन झाले (Laxman Jagtap Passes Away) आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दीर्घ आजारामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यंतरी अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. त्यांच्या बरे होण्याची आस असतानाच त्यांनी आज अचानक मनाला चटका लावणारी एक्झिट घेतली. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

लक्ष्मण जगपात ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. परंतु शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आजाराशी झुंज दिली. नेहमीच एक कार्यक्षम, निष्ठावंत नेता काय असतो, याचे उदाहरण त्यांनी घालून दिले होते. आपल्या कार्यातून ते विरोधकांना उत्तर देत असत. पिंपरी-चिंचवडच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

विधान परिषद निवडणुकीतील लक्ष्मण जगताप यांचा किस्सा तर नेहमी सर्वांच्या स्मरणात राहिल. विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी गेले होते. तब्येत बरी नसतानाची रुग्णवाहिकेतून ते मुंबईला गेले होते आणि त्यांनी पीपीई किट घालून मतदान केले होते. राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी लक्ष्मण जगताप यांना लढवय्ये आमदार म्हणत त्यांना हा विजय समर्पित केला होता.