अश्रू थांबता थांबेना! १२ दिवसांत पुण्यातील २ भाजपा आमदारांची मावळली प्राणज्योत

पुणे: चिंचवड येथील भाजपा आमदार (BJP MLA) लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे आज सकाळी निधन झाले (Laxman Jagtap Passes Away) आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रदीर्घ आजारामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यातही भारतीय जनता पक्षासाठी (BJP) हा मोठा धक्का होता. कारण गेल्या १५ दिवसांत भाजपाने पुण्यातील २ झुंजार नेतृत्त्व गमावले आहेत.

लक्ष्मण जगताप यांच्यापूर्वी पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाले. गेल्या महिन्यातच २२ सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आणि आज दिनांक ३ जानेवारी रोजी लक्ष्मण जगताप जग सोडून गेले. अशाप्रकारे केवळ १२ दिवसांतच पुण्यातील भाजपाच्या दोन आमदारांनी जगाचा निरोप घेतला आहे.

लक्ष्मण जगपात ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. मध्यंतरी अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले होते. शिवाय विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली.

दुसरीकडे मुक्ता टिळक यांचे उपचारदरम्यान निधन झाले होते. मुक्ता टिळक कर्करोगाने आजारी होत्या. ( BJP MLA Mukta Tilak passed away) कसबा मतदार संघात त्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्या आधी पुण्याच्या अडीच वर्ष महापौर होत्या. त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात नगरसेवक या पदावरुन केली. त्या चार वेळा पुणे महापालिकेत भाजपच्या नगरसेवक होत्या.