केंद्राची सुरक्षा असताना किरीट सोमय्यांवर हल्ला; परिणाम भोगायला तयार रहा – चंद्रकांत पाटील

पुणे : संजय राऊत यांनी केलेल्या वक्त्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालं आहे. संजय राऊत यांनी इडी आणि भाजपवर आरोप केले आहेत. तसेच इडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषदेत सगळं उघड करणार असल्याचंही त्यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

विश्वास घात करून महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यांना आता येत्या २७ फेब्रुवारीला २७ महिने पुर्ण होतील. या कालावधीत अनेकांच्या भ्रष्टाचाराचे विषय समोर आले. दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी घडलं नव्हतं अशी उलथापालथ सध्या चालली आहे. त्यामध्ये परमबीर सिंगांनी अनिल देशमुखांनावर आरोप केला. संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. यामध्ये ठाकरे कुटुंबातील सदस्यांनावर आरोप झालेत.परंतु याआधी कधीही परीस्थिती आलेली नव्हती की किरीट सोमय्यांना वर हल्ला करा. केंद्राची झेड सुरक्षा असताना त्या सुरक्षेला धक्के मारून किरीट सोमय्यांना जीवे मारण्याचा २७ महिन्यात पहिल्यांदा प्रयत्न झाला. त्याचे परिणाम पुढे भोगायला लागणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ते बोलताना पुढे म्हणाले की, यावरून आपल्याला समजतं की अशा एका माणसांना वर आरोप झाले की त्याला सहनही होत नाही. त्यांना ते पेलतही नाहीत. त्यातून हल्ला आणि रोज उठून पत्रकार परिषदेत धमक्या देणं, आम्ही वाघ आहोत आम्ही सिंह आहोत. मुंबई आमची आहे, असं सगळं सुरू झालं आहे.

केंद्राची सुरक्षा असताना किरीट सोमय्यांना मारणं. इकतं याचं धाडस आहे. हे असं झालं की आपण खूप बोलतं. परंतु काचेच्या घर असणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घराला दगड मारायचे नसतात. इडीच्या माध्यमातून जे आरोप करताहेत. त्यासाठी न्यायालय आहे की न्यायालयात जा, असंही त्यांनी म्हटलं.