अमरावती पालिका आयुक्तांनावरील शाईफेक प्रकरण ! रवी राणांसह ११ जणांवर गुन्हा दाखल

अमरावती : पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या वर शाईफेक केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी राणा आणि इतर ११ जणांवर कलम ३०७ अंतर्गत हत्येचा आरोप केल्याचा आरोप पालकाकडून लावण्यात आला आहे. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. राजापेठ चौकातील रेल्वे उड्डाणपुलावरजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवल्यामुळे काल आयुक्तांनावर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

शाईफेक केल्याप्रकरणी अग्निशमन दल वगळता कामबंद आंदोलन आज केले जाणार आहे. राजपत्रित अधिकारी, नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग हे सगळे आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर झालेल्या या सर्व प्रकरणात मला जाणूनबुजून गुन्हांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकर करत असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

रवी राणा म्हणाले की, शाईफेक केली त्यावेळी मी दिल्लीत होतो. ज्यांनी शाईफेक केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. परंतू फक्त राजकीय सुडबुद्धीने माझ्यावर रात्री साडेअकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांचा मला फोन आला. पालकमंत्र्यांनी सातत्याने पाठपुरावा केला की, रवी राणा यांचं नाव त्या गुन्हांमध्ये घेतलं गेले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मला विनाकारण गुन्हांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.

शहरातील राजापेठ चौकातील रेल्वे उड्डाणपुलावरजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवल्यामुळे तेथील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार रवी राणा यांच्या महिला समर्थकांनी महानगरपालिकेचे आयुक्त आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केली. ११ जानेवारी रोजी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी शहरातील राजापेठ चौकातील रेल्वे उड्डाणपुलावर मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला. त्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा यांनी त्या पुतळ्याचे अनावर देखील केले. महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचं पालिकेच्या लक्षात आलं. त्यानंतर तो पुतळा महानगरपालिकेकडून हटवण्यात आला.