नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी David Warnerची मोठी घोषणा, क्रिकेट जगतामध्ये खळबळ

David Warner Quit ODIs: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारी (1 जानेवारी) सिडनी क्रिकेट मैदानावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तो म्हणाला की आता मी एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत आहे. दरम्यान, त्याने आधीच कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. सिडनी येथे ३ जानेवारीपासून सुरू होणारा पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा लाल चेंडूचा सामना आहे.

पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका ही कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका असेल, असे वॉर्नरने फार पूर्वीच जाहीर केले होते. या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाही त्याला विशेष निरोप देण्याची तयारी करत आहे. दरम्यान, वॉर्नरने आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती देऊन सर्वांनाच चकित केले आहे.

वॉर्नर म्हणाला, ‘मी निश्चितपणे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. विश्वचषकादरम्यानच मी या गोष्टीचा विचार केला होता. आज मी ठरवले आहे की क्रिकेटच्या या फॉरमॅटलाही अलविदा करण्याची वेळ आली आहे. या निर्णयानंतर मला जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळण्याची संधी मिळेल. बरं, मला माहित आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी अगदी जवळ आली आहे. येत्या दोन वर्षांत जर मी चांगले क्रिकेट खेळत राहिलो आणि ऑस्ट्रेलियाला माझी गरज असेल तर मी उपलब्ध असेल.

डेव्हिड वॉर्नरच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6932 धावा आहेत. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 161 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा भागही होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नरची फलंदाजीची सरासरी ४५.३० आणि स्ट्राईक रेट ९७.२६ आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 22 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात अधिक धावा जमा झाल्या आहेत. वॉर्नरने 111 कसोटी सामन्यात 44.58 च्या सरासरीने 8695 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 26 शतके झळकावली आहेत.

महत्वाच्या बातम्या-