अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई – महाराष्ट्रात सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणूक २०२२ ची (Andheri East Bypoll Election) चर्चा आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला असताना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली.

ही निवडणूक ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार होता. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपकडून (BJP) या निवडणुकीत झुंजार नेते मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी देण्यात आली होती , तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्व. आ. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली होती.

दरम्यान,मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील CM एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते.