Malaika Arora | मला प्रचंड राग आलाय, हे सहन करण्यापलिकडे; मलायकाने मुख्यमंत्री शिंदेंकडे केली कारवाईची मागणी

Malaika Arora, Eknath Shinde: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा (Malaika Arora) हिने एका प्रकरणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे दाद मागितली आहे. मला खूप राग येत आहे आणि हे असह्य आहे, असे म्हणत मलायका अरोराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रशासनाकडून कारवाईचे आवाहन केले आहे. ठाण्यातील एका पेट क्लिनिकमध्ये कुत्र्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर मलायकाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मलायकाशिवाय रितेश देशमुख आणि जुई गडकरी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

ठाण्यातील आर मॉलजवळील वेटिक पेट क्लिनिकमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे देखभालीसाठी आणलेल्या एका कुत्र्याला क्लिनिकच्या दोन कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना ७ ते ८ फेब्रुवारी दरम्यान घडली. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सेलिब्रिटींनी केली कारवाईची मागणी…
कुत्र्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी अभिनेत्री मलायकाने केली आहे. ती म्हणाली की, अशा प्रकारची वागणूक अत्यंत त्रासदायक आहे. या पेट क्लिनिकवर कारवाई करावी, असेही ती म्हणाली.

या व्हिडिओवर अभिनेता रितेश देशमुखने संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रितेश देशमुखने कुत्र्याला मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक करण्याची मागणी केली आहे. रितेशने कुत्र्याच्या मारहाणीचा व्हिडिओ इन्स्टा स्टोरीवर शेअर केला होता.

महत्वाच्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!